अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भामपूरात युवकाचा खून


पाच आरोपींना अटक : शिरपूर तालुक्यातील दुसरी घटना

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील फत्तेपुर कुंबीपाडा येथे अनैतिक संबंधातून मुलानेच बापाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा जुने भामपूर येथे 23 रोजी पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाचा खून झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. विनोद सतीलाल पाटील (38) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

खुनाने शिरपूर तालुका हादरला
23 मे रोजी पहाटे मयत विनोद व त्याचे वडील सतीलाल बाबुराव पाटील हे खळ्यात गाई-म्हशींचे दूध काढण्यासाठी जात असतांना संशयीत आरोपी ज्ञानेश्वर संभाजी पाटील, बाळासाहेब चंद्रकांत पाटील, भरत दगा पाटील, चंद्रशेखर चंद्रकांत पाटील, कैलास दगा पाटील यांनी संगतमताने मयताच्या तोंडात रुमलाचा बोळा कोंबून लाठ्या-काठ्याने मारहाण करीत विळा, कुर्‍हाड, कोयत्याने मानेवर व गळ्यावर सपासप वार करून त्याचा खून केला. मयताच्या वडिलांवरही हल्ला झाला मात्र ते मारेकर्‍यांच्या हातातून सुटून पळाले. शिरपूरचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय किरण बार्‍हे, अनिल शिरसाठ, धनगर,पोना ललित पाटील, गवळे, योगेश कोळी हे घटनास्थळी धाव घेतली. पसार आरोपींपैकी पाच आरोपींना पोलिसांनी गावातूनच ताब्यात घेतले तर ज्ञानेश्वर संभाजी पाटील यास शोध पथकाने झोडगे, ता.मालेगाव येथून दुपारी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

मित्रांच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा
मयत विनोद पाटीलचे आरोपी ज्ञानेश्‍वर पाटील याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते व त्यातूनच विनोदवर वर्षभरापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यानंतर विनोदला जामीन मिळाल्याने तो घरी परतला होता मात्र व तेव्हापासून आरोपी हे विनोदचा काटा काढण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप मयत विनोदच्या वडिलांनी केला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !