14 लाखांची केळी खरेदी करीत रक्कम देण्यास नकार : यावल तालुक्यातील त्रिकूटाविरोधात गुन्हा
Refusal to Pay After Purchasing Bananas Worth ₹14 Lakhs: Case Registered Against Trio from Yawal Taluka जामनेर (14 मे 2026) : केळी खरेदीच्या व्यवहारातून तब्बल 13 लाख 37 हजार 125 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी यावल तालुक्यातील तिघांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
शेख युनूस शेख मजीत (44, व्यवसाय शेती, रा.वाकोद, ता.जामनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर युवराज सूर्यवंशी, युवराज सूर्यवंशी व अतुल युवराज सूर्यवंशी (सर्व रा.दशानूर, ता. यावल) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.






फिर्यादीनुसार, आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांकडून सुमारे 703.75 क्विंटल वजनाची केळी विश्वासाने घेतली होती. या केळींची किंमत 13 लाख 37 हजार 125 रुपये इतकी होती मात्र व्यवहारानंतर वारंवार पैशांची मागणी करूनही आरोपींनी रक्कम परत दिली नाही तसेच टाळाटाळ करत फिर्यादीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही घटना 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच5 वाजेदरम्यान वाकोद येथील शेतगट क्रमांक 403 जवळ घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास पोलीस कर्मचारी गणेश सुस्ते करीत आहेत.


