भुसावळात गावठी कट्टा बाळगणार्या बर्हाणपूरच्या आरोपीसह दोघांना अटक
बाजारपेठ पोलिसांची कारवाई : स्थानिक आरोपीने कट्टा पुरवल्याने दुसर्या संशयीतीलाही पडल्या बेड्या
Two arrested in Bhusawal—including an accused from Burhanpur—for possessing a country-made pistol भुसावळ (15 मे 2026) : गावठी कट्टा बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने भुसावळातील आलेल्या मध्यप्रदेशातील आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीने हा कट्टा स्थानिक संशयीताने पुरवल्याची माहिती दिल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळच्या घोडेपीर बाबा दर्गा परिसरात एक तरुण गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना कळताच पथकाने गुरुवारी धाव घेतली. यावेळी संशयीत अरसद अली शेख खालीद अली (20, रा.आझाद नगर, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतल्यानंतर अंगझडतीत 40 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस मिळून एकूण 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी अरसदनेहा कट्टा मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (19, रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) याने ठेवण्यासाठी दिल्याची कबुली देताच त्यालाही अटक करण्यात आली व गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, जीवन कापडे, चंद्रकांत रायपूरकर, अक्षय कोतकर आदींच्या पथकाने केली.



