अमळनेरात हॉटेल वेटराचा मृत्यू : हॉटेल मालकाची निर्दोष सुटका


अमळनेर (15 मे 2026) : वेटरचा खून करून पुरावे नष्ट केल्याच्या आरोपातून शहरातील साई रुपाली हॉटेलचे मालक नरेंद्र चौधरी यांची जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे प्रकरण ?
22 एप्रिल 2023 रोजी साई रुपाली हॉटेलचा वेटर दगडू नारा1यण पाटील हा पहाटे सहा वाजता हॉटेलच्या बाहेर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला धुळे येथे जिल्हा सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला उपचारासाठी गुजरातमध्ये सुरत येथे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले मात्र 6 मे रोजी त्याचा मृत्यू झाल्याची नोंद गुजरातच्या खटोदरा पोलीस स्टेशनला करण्यात आली. त्यानंतर चौकशीनंतर तीन महिन्यानी 21 जुलै 2023 ला हॉटेल मालक नरेंद्र यशवंत चौधरी यांच्याविरुद्ध खून करणे आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला व 29 जुलै 2023 ला नरेंद्र चौधरी याला अटक करण्यात आली.







हॉटेल मालकाची निर्दोष मुक्तता
उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर हॉटेल मालक कारागृहात होते. हा खटला अमळनेर सत्र न्यायालयात सुरू होता. न्या.एल.डी.गायकवाड यांनी 15 साक्षीदार तपासले. संशयीत नरेंद्र चौधरी यांच्यातर्फे अ‍ॅड.शामकांत रावजी पाटील यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नरेंद्र चौधरी यांची खुनातून निर्दोष मुक्तता केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !