अमळनेरात शॉक लागून मजुराचा मृत्यू


Laborer Dies of Electric Shock in Amalner अमळनेर (15 मे 2026) : घराच्या छताच्या भिंतीला पाणी मारताना विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 13 रोजी सकाळी साडे नऊ वाजता घडली. बलीराम फुलसिंग बारेला (38, अछाली, ता.सेंधवा, जि.बडवाणी) असे मृत मजुराचे नाव आहे.

बांधकामावर लागला शॉक
बलीराम हा सध्या अमळगाव येथे वास्तव्यास होता. तो खवशी येथील प्रदीप पांडुरंग पाटील यांच्या घराच्या बांधकामावर काम करीत असताना बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता तो छतावरच्या भिंतींना पाणी मारत असताना छतावरून गेलेल्या विद्युत तारांचा शॉक लागल्याने तो खाली पडला.







ग्रामस्थांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा चुलत पुतण्या नबी आपसिंग बारेला यांनी फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !