अमळनेर यात्रोत्सवात हाणामारी : दोन्ही गटातील 11 जणांविरोधात गुन्हा
Clash at Amalner Fair : Case Registered Against 11 Individuals from Both Factions अमळनेर (15 मे 2026) : खुन्नस देण्यावरून जुना वाद उकरून पैलाड येथील दोन गटात संत सखाराम महाराज यात्रेत हाणामारी झाली. या हाणामारीत तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवार, 11 रोजी रात्री बोरी नदी पात्रात घडली. दोन्ही गटातील 11 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे मारहाण प्रकरण
दोन-तीन दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर जयदेव पाटील व योगेश गोविंदा धनगर (रा.पैलाड) व निखील पाटील (पैलाड) यांच्यात खुन्नस देण्यावरून वाद झाले होते. काहींच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आले. 11 रोजी यात्रेत ड्रॅगन पाळण्या समोरून जात असताना निखील, मयूर आणि गणेश यांनी त्यांच्या अंगावर धावून शिवीगाळ केली आणि निखिलने चाकूने ज्ञानेश्वर च्या पोटात मारायला गेला. तो योगेशने हातावर झेलला.






गणेश आणि खुशाल यांनी त्याला पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि मयूरने ज्ञानेश्वराला मागून पकडून ठेवले निखीलने ज्ञानेश्वरच्या गालावर चाकूने वार केला. होमगार्ड आल्यानंतर सर्व पळून गेले. जखमींनी दवाखाण्यात उपचार घेतले. योगेश गोविंदा धनगर यांनी फिर्याद दिल्यावरून निखील सुरेश पाटील, मयूर सुरेश पाटील, गणेश रमेश पाटील, खुशाल रामदास पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.
दुसर्या गटाचीही तक्रार
दुसर्या गटातील निखील यांच्या फिर्यादीनुसार, यात्रेत फिरत असताना योगेश गोविंद कंखरे, ज्ञानेश्वर जयदेव पाटील, अक्षय विजय पाटील, दीपक बापूजी कंखरे, कुंदन पाटील, मुकेश धनगर, गोलू धनगर यांच्याजवळ लाकडी दांडके, लोखंडी रॉड होते. योगेश यांच्याकडे चाकु होता. सर्व जण वादावरून शिवीगाळ करू लागले योगेशने हातातील चाकूने छातीवर वार केला तो हातावर झेलला आणि ज्ञानेश्वरने हातातील लोखंडी रॉडने डोक्यावार केला. तोही हाताने झेलल्याने हाताचे बोट फ्रक्चर होऊन उजव्या अंगठ्याजवळील नस कापली गेली. नंतर पोलीस आल्याने सर्व जण शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेले. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.


