पाच हजारांची लाच भोवली : पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

तक्रार अर्जावरून कारवाई न करण्याच्या मोबदल्यात मागितली लाच : पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात खळबळ


गणेश वाघ
Bribe Demanded in Exchange for Not Acting on Complaint: Sensation at Pimpalgaon Baswant Police Station भुसावळ (15 मे 2026) : तक्रार अर्जावरून कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच तडजोडीअंती स्वीकारताना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव (बसवंत) पोलीस ठाण्याच्या हवालदाराला नाशिक एसीबीने अटक केली आहे. शुक्रवार, 15 रोजी सायंकाळी हा सापळा यशस्वी करण्यात आला. संतोष राघो ब्राम्हणे (44) असे अटकेतील लाचखोराचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
एसीबीच्या अधिकृत माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील अर्ज चौकशीची प्रक्रिया आरोपी हवालदारांकडे सुरू होती. या प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना मदत करून कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.







तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी पिंपळगाव (बसवंत) पोलीस स्टेशन परिसरात आरोपी हवालदाराने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पिंपळगाव (बसवंत) पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यचात आला

यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष पैलळकर, हवालदार गणेश निंबाळकर, हवालदार प्रमोद चव्हाणके, चालक हवालदार विनोद पवार आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !