पत्नीसमोरच अपमान केल्याचा राग विकोपाला : शिरपूरात जन्मदात्यांची डोक्यात मुसळ टाकून हत्या


Rage over public humiliation before wife reaches breaking point : Parents bludgeoned to death with a pestle in Shirpur शिरपूर (15 मे 2026) : कुठल्यातरी क्षुल्लक वादातून पत्नीसमोर जन्म-दात्यांनी मुलाचा अपमान केल्याने संतप्त मुलाने आई-वडीलांच्या डोक्यात मुसळ टाकून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना शिरपूरच्या महावीर सोसायटीत शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडली. इंदाराम महतो (50) व त्यांची पत्नी रांजुदेवी महतो (42, मूळ रा.बिहार, ह.मु.शिरपूर) अशी मृतांची नावे आहेत तर चंदन इंदाराम महतो असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अपमान सहन झाल्याने जन्मदात्यांची हत्या
महतो कुटूंबात लग्न सोहळा असल्याने तो पार पडून कुटूंब शिरपूरात परतले मात्र काहीतरी वादातून आई-वडिलांनी संशयीत चंदनला त्याच्या पत्नीसमोर काहीतरी अपमानास्पद शब्द वापरले. आपल्या पत्नीसमोर आई-वडिलांनी आपला अपमान केला, ही गोष्ट चंदनच्या जिव्हारी लागली आणि त्याचा रागाचा पारा अनावर झाला. याच रागाच्या भरात त्याने घरात असलेले मुसळ उचलले आणि थेट आपल्या जन्मदात्या आई आणि वडिलांच्या डोक्यात एकापाठोपाठ एक सपासप प्रहार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.







आरोपी पसार होण्यापूर्वीच जाळ्यात
आई-वडीलांची हत्या केल्यानंतर आरोपी चंदन महतो हा घटनास्थळावरून पळण्याच्या प्रयत्नात असताना शेजारील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडून ठेवले शिरपूर पोलिसांना माहिती कळवली. शिरपूर पोलिसांनी या दुहेरी हत्याकांड प्रकरणाची नोंद केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !