धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई : गावठी कट्ट्यासह संशयीत जाळ्यात
Major Operation by Dharangaon Police : Suspect Apprehended with Country-made Pistol धरणगाव (16 मे 2026) : धरणगाव पोलिसांनी एका संशयिताला गावठी बनावटीच्या कट्ट्यासह अटक केली आहे. आनंदा बळीराम सपकाळे (39, रा.आव्हाणे, ता.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीनंतन करवाई
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्रे आणि घातक शस्त्रे बाळगणार्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील पवार यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
गुरुवार, 14 मे 2026 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते हे पथकासह दोनगाव शिवारातील गिरणा नदीपात्रात अवैध रेती वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना नदीपात्रात एक इसम संशयास्पद रितीने फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 25 हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्टल आढळल्याने ती जप्त करून संशयीत आनंदा बळीराम सपकाळे (39, रा.आव्हाणे, ता.जळगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर करत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस उपनिरक्षक दत्तात्रय बडगुजर, ज्ञानेश्वर बाविस्कर, रवींद्र चौधरी, विशाल पाटील आदींच्या पथकाने केली.








