शहादा पोलिसांची मोठी कारवाई : पाच लाखांच्या गांजासह शिरपूरचे दोघे जाळ्यात

20 किलो 564 ग्रॅम गांजा जप्त : गांजा तस्करी पुन्हा ऐरणीवर


Major Action by Shahada Police : Two from Shirpur Nabbed with Ganja Worth ₹5 Lakhs शहादा (16 मे 2026) : अवैधरित्या अंमली पदार्थांची (गांजा) वाहतूक करणार्‍या शिरपूर तालुक्यातील दोन संशयितांना शहादा पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 20 किलो 564 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे चार लाख 81 हजार 280 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलिसांनी शुक्रवार, 15 मे रोजी विशेष तपास मोहीम राबविली होती. त्यातच शहादा निरीक्षक हेमंत पाटील यांना गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. असलोद-दामळदा रस्त्यावर संशयीत दुचाकी (एम.एच.03 बी.के.7511) येताच त्यांना ताब्यात घेण्यात आले व वाहनावरील प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेला गांजा जप्त करण्यात आला.

शिरपूर तालुक्यातील दोघांविरोधात गुन्हा
या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये संशयीत सुशील सुमा पावरा (30, मोहिदा, ता.शिरपूर) व गजेंद्र जितेंद्र पावरा (21, मोहिदा, ता.शिरपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनीन अंमली पदार्थांचा साठा कुठून आणला गेला आणि तो कुठे पाठविण्यात येणार होता, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार अधीक्षक अश्विनी सानप, अपर आशीत कांबळे, उपअधीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, एपीआय संदीप वाघ, एएसआय अशोक कोळी, हवालदार बहादुर भिलाला, शिपाई भगवान सावळे, कपिल मंदील, विकास शिरसाठ, भरत शिंपी, मिथून सिसोदे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !