अज्ञात वाहनाच्या धडकेने अमळनेर तालुक्यातील तरुण ठार
अमळनेर (16 मे 2026) : एकलहरे शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कळंबू गावातील युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्वल आनंदसिंग गिरासे (39, रा. कळंबू, ता.अमळनेर, जि.जळगाव) हे 13 मे 2026 रोजी सकाळी दहाच्या सुमारास एकलहरे शिवारातील डांबरी रस्त्यावरून दुचाकीने जात होते.
राजेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या शेतासमोरील रस्त्यावर अज्ञात वाहन चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत उज्वल गिरासे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की उज्वल गिरासे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी डॉ.संदीप दशरथ राजपूत (50, दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि. धुळे) यांनी फिर्याद दिल्यावरुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









