तरुणीने कानशीलात लगावली : अपमान सहन न झाल्याने तरुणाने गळफास घेत जीवन संपवले !


Young Woman Slaps Him : Unable to Bear the Humiliation, Young Man Ends His Life by Hanging Himself! बीड (16 मे 2026) : तरुणीनं भररस्त्यात सर्वांसमक्ष थोबाडीत मारल्याने झालेला अपमान सहन न झाल्याने एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना : बीड जिल्ह्यातील मोहा येथे घडली. चंद्रहार राजेभाऊ शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण
13 मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका तरुणीने करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमक्ष त्याला थोबाडीत मारल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर चंद्रहार शिंदे मानसिक तणाव आणि नैराश्यात गेल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

14 मे रोजी सायंकाळी चंद्रहार याने आपल्या वडिलांना फोन करून, हा माझा शेवटचा फोन आहे, यापुढे माझा फोन येणार नाही, असं सांगितलं. त्यानंतर त्याने फोन बंद केला. या वाक्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं.

वडिलांना फोन केल्यानंतर चंद्रहार शिंदे मौजे करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ येथे गेला. तेथे त्याने लिंबाच्या झाडाला सुती पांढर्‍या दोरीने गळफास घेऊन जीवन संपवलं. मुलाचा शोध घेत असताना वडिलांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

या प्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !