यावल शहरातील आयेशा नगरात भर दुपारी घरफोडी


Mid-day Burglary in Ayesha Nagar, Yawal City यावल (17 मे 2026) : यावल शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या विस्तारित भागातील आयेशा नगरात शनिवारी भर दुपारी घरफोडी झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. कुटुंबीय अयेशा नगरात एका लग्नात समारंभात जेवणासाठी गेले होत. तर कुटुंबातील प्रमुख हे लोहारा, ता.शेगाव येथे लग्न समारंभात असल्याची संधी चोरट्यांनी साधली.

भर दिवसा घरफोडीने खळबळ
चोरट्यांनी घराच्या दरवाज्याच्या कडी-कोड्यांला तोडून आत प्रवेश करून कपाटात असलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, काही रोख रक्कम लांबवली आहे. दरम्यान घरातून किती किंमतीचा मुद्देमाल चोरी गेला आहे. हे कुटुंबातील प्रमुख परतल्यावरच कळणार आहे. भर दुपारी अशा पद्धतीने झालेल्या घरफोडी मुळे शहरात खळबळ उडाली आहे.

रोकडसह दागिने लंपास
शहरातील विस्तारित भागात भुसावळ रस्त्यालगत आयेशा नगर आहे. या आयेशा नगरच्या प्रवेशद्वारच्या अलीकडेच राहत असलेल्या रज्जाक देशपांडे यांच्या घरात घरफोडी झाली. ही घटना शनिवारी दुपारी बारा ते चार या वेळेत घडली. कुटुंबातील महिला या आयेशा नगरात असलेल्या एका विवाह समारंभात जेवणासाठी आल्या होत्या. तर कुटूंब प्रमुख देशपांडे हे लोहारा, ता.शेगाव येथील लग्नासाठी जाण्यासाठी दुपारीच घरून निघाले होते. बंद असलेल्या घराच्या दरवाज्याच्या कडीकोंड्याला तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. मागील बेडरूम मध्ये कपाटात ठेवलेला सोन्याचा हार व काही प्रमाणात रोख रक्कम त्यांनी तेथून लांबवली आहे.

घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम किती चोरीला गेली. हे रज्जाक देशपांडे हे लोहारा येथून परतल्यावर कळणार आहे. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख, हवालदार उमेश महाजन हे पथकासह दाखल झाले होते. त्यांनी परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. घरफोडीची माहिती रज्जाक देशपांडे यांना देण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !