चुंचाळे-गायरान व नायगाव ते चुंचाळे दरम्यान पुन्हा विद्युत तार चोरी : चार लाखांचे तार चोरीला
एकाच ठिकाणी आठवड्याभरात दोन वेळा चोरी : मक्तेदारांकडून चोरट्याविरोधात तक्रार
Electricity Wires Stolen Again in Chunchale-Gayran and Between Naigaon and Chunchale: Wires Worth ₹4 Lakhs Stolen यावल (17 मे 2026) : यावल तालुक्यातील चुंचाळे ते गायरान विद्युत उपकेंद्र दरम्यान टाकण्यात आलेल्या खांबावरील तसेच नायगावपासून ते चुंचाळे दरम्यान टाकण्यात आलेल्या खांब्यावरील पुन्हा विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने खळबळ उडाली. गत आठवड्यात देखील याचं भागातील दोन लाख 10 हजार रूपये किंमतीचे तार चोरी झाले होते तर आता पुन्हा गुरुवारी रात्री तब्बल चार लाखांचे तार चोरी करण्यात आले. मक्तेदाराकडून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
सततच्या चोर्यांनी मनस्ताप
चुंचाळे, ता.यावल गावात विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशनचे काम सुरू आहे. येथे सब कॉन्ट्रॅक्टर अतुल चौधरी (वड्री) हे चुंचाळे ते गायरान दरम्यान गावठाण 11 केव्हीचे काम करत आहेत. गेल्या आठवड्यात या ठिकाणचे त्यांचे खांबावर टाकलेले तार चोरी झाले. पाच गाल्याचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्यानंतर संपूर्ण काम लवकर पुर्ण करतांना चौधरी यांनी आता 10 गाल्याचे तार खांबावर टाकले होते ते गुरूवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. तब्बल दोन लाख 10 हजार रुपये किंमतीचे लांबवण्यात आले.
हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. तसेच याच सबस्टेशन अंतर्गत राहुल दिनकर चौधरी (साकळी) हे देखील नायगाव ते चुंचाळे रस्त्यावर काम करत होते. त्यांचे देखील गेल्या आठवड्यात सात झाल्याचे तार चोरी झाले होते. आता पुन्हा त्यांचे 10 गाल्यावरील खांबावर टाकण्यात आलेले तार चोरी झाले आहे ज्याची किंमत दोन लाख 10 हजार रूपये इतकी होती. याबाबत संबंधीत सब कंत्राटदार यांच्याकडून यावल पोलिसात तक्रार देण्यात आली.
आठवड्याभरात एकाचं ठिकाणी दोन वेळा चोरी
गेल्या आठवड्याभरापुर्वी ज्या ठिकाणी चोरी झाली होती तेथे पुन्हा अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने चोरट्यांची हिंमत चांगलीच वाढल्याचे दिसून येते. पोलिसांसमोर आता चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे.










