‘हतनूर’ धरणातून आवर्तन सुटले : भुसावळकरांचा पाणीप्रश्न मिटला
दूषित पाण्याची डोकेदुखी कमी होण्याची आशा : सलग पाच दिवस मिळणार पाणी
Water Release from Hatnur Dam Begins: Bhusawal’s Water Crisis Resolved भुसावळ (18 मे 2026) : भुसावळ शहरातील तापी नदीतील बंधार्याने तळ गाठल्याने शहराला दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत होता. आवर्तनाची मागणी सातत्याने केली जात असतानाच शनिवार, 16 रोजी सकाळी आठ वाजता चार हजार 600 क्युसेक आवर्तन सोडण्यात आले. 16 ते 20 मे दरम्यान दररोज 800 क्युसेक प्रमाणे पाणी सोडण्यात येणार असून आज वा उद्या पाणी बंधार्यात पोहोचल्यानंतर शहराची पाणी समस्या सुटणार आहे.
दरम्यान, आवर्तनामुळे भुसावळसह वरणगाव शहर, आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्र, भुसावळ मध्य रेल्वेचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
बंधार्याने तळ गाठल्यने समस्या
शहरात 12 ते 15 दिवसाआड होणार्या पाणीपुरवठ्याने नागरिक आधीच संतप्त असतानाच बंधार्यातील पाण्याने तळ गाठल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागत होता. शहरवासीयांना दिलासा मिळण्यासाठी पालिकेने प्रशासनाकडे आवर्तनाची मागणी केल्यानंतर शनिवार, 16 रोजी सकाळी आठ वाजता चार हजार 600 क्युसेक आवर्तन सोडण्यात आले. 16 ते 20 मे दरम्यान दररोज 800 क्युसेक प्रमाणे पाणी सोडण्यात येणार आहे. आज वा उद्या हे पाणी तापीच्या बंधार्यात पोहोचल्यानंतर पाणीप्रश्न सुटणार आहे.










