राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी नोकरीच्या आमिषाने 14 लाखांची फसवणूक : जळगावात एकाविरोधात गुन्हा
जळगाव (गुरुवार, 23 जुलै 2026) : राज्य उत्पादन शुल्क विभागात शिपाई पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जळगावातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
फिर्यादी मंगेश सुनील सुरडकर (27, रा. तंत्रनगर, खामगाव, जि.बुलढाणा) यांना आरोपी शंकर विश्वनाथ नाईक (रा. विशाल नगर, जागृत गणपती मंदिरासमोर, मोर चौक, नांदेड) याने राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.
ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत आरोपीने फिर्यादीकडून विविध टप्प्यांत 14 लाख रुपये घेतले मात्र नोकरी न लावता तसेच घेतलेली रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोली सनिरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्ग्दर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय तडवी करीत आहेत.



