भुसावळातील तरुणाची गारबर्डी धरण परिसरातून दिड लाखांची रोकड लांबवली : त्रिकूटाला सावदा पोलिसांनी ठोकल्या बेड्या


सावदा (गुरुवार, 23 जुलै 2026) : भुसावळातील तरुण मित्र-मैत्रिणींसमवेत रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण परिसरात फिरण्यासाठी आल्यानंतर त्याच्या वाहनातील दिड लाखांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे चोरी झाली होती. सावदा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रावेर तालुक्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना 21 रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर 23 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लूट प्रकरण
भुसावळातील शेख समीर शेख (खडका चौफुली, उस्मानिया मशीदसमोर, भुसावळ) हे मित्र-मैत्रिणींसह इको कार (एम.एच.02 सी.एच.8499) ने गारबर्डी धरण परिसरात फिरण्यासाठी 19 रोजी आले होते. त्यावेळी त्यांनी कार लॉक केली मात्र डिक्की उघडी राहिल्याची संधी चोरट्यांनी साधतून वाहनाचा हप्ता भरण्यासाठी आणलेली दिड लाखांची रोकड, महत्त्वाची कागदपत्रे व पर्स लांबवण्यात आली होती. या प्रकरणी सावदा पोलिसात त्यांनी तक्रार देत त्या भागात संशयास्पदरित्या फिरणार्‍या तीन जणांवर संशय व्यक्त केला.

तीन आरोपींना अटक
सावदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दिलेल्या वर्णनावरून तीन संशयीताना 21 रोजी ताब्यात घेतले. राजू रज्जाक तडवी (31, रा. खिरोदा, ता.रावेर), शरीफ वजीर तडवी (25, रा. चिंचाटी, ता.रावेर)
व अकिल उस्मान तडवी (31, रा.लोहारा, ता.रावेर) यांना बोलते केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. शरीफ तडवी याच्या खिशातून पोलिसांनी तक्रारदाराचे आधारकार्ड, एटीएम, आरसी बुक व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. आरोपींनी चोरलेली रक्कम काय केली? याचा तपास सुरू आहे. आरोपींना 21 जुलै रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, रावेर यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 23 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक गणेश फड, एएसआय जयराम खोडपे, विनोद पाटील, हवालदार अतुल तडवी, मेहरबान तडवी, निलेश बाविस्कर, उमेश पाटील, मोहसीन पठाण, राजेश बोदडे, सुनील सैंदाणे, संजय तडवी, बबन तडवी, मयूर पाटील, राहुल येवले, सुनील कुरकुरे, राकेश झोपे, चालक नामदेव कापडे आदींच्या पथकाने केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !