चोरीचा संशय व्यक्त केल्याने बोदवडला तरुणाची हत्या

हल्ल्यापूर्वी सोशल मिडीयावरही टाकले स्टेटस : जमावाने आरोपीचे घर पेटवले


Youth Murdered in Bodwad Over Suspicion of Theft बोदवड (22 मे 2026) : घरातील चोरी प्रकरणात घराजवळील एकावर संशय व्यक्त केल्याच्या रागातून बोदवडला तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, 20 मे रोजी घडली. दरम्यान, संतप्त जमावाने आरोपीचे घरदेखील पेटवले असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाविरोधात देखील यावेळी रोष व्यक्त करण्यात आला. अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सूरी) असे खून झालेल्या तरुणाचे तर अरबाज शाह असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

खुनापूर्वी सोशल मिडीयावर टाकले स्टेटस
शहरातील हिदायत नगर मध्ये राहणार्‍या अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सूरी) यांच्या घरात गत आठवड्यात चोरी झाली होती त्यात तीन ते चार लाख रुपयांचा मुद्देमाल गेला होता. त्यात त्यांनी बोदवड पोलिसात तक्रार दिल्यानंतर घराजवळील काहींवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी संबंधिताची चौकशी करून त्यांना सोडून दिले होते मात्र संशयीत अरबाज याने तक्रारदाराला अडवत पोलिसांकडे आपले नाव का सांगितले? म्हणत दम भरत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. मयताने याबाबतही पोलिसांना कल्पना दिली होती.




संययीत आरोपी अरबाजने बुधवारी मोबाईलच्या स्टेटसला ‘आज तेरा गेम होगाश म्हणत बाजारातून चाकू आणून अन्सार पिंजारी हा दुपारी जेवण करून कामावर जात असताना हल्ला चढवला. ही घटना म्हसोबा देवस्थानजवळ घडली होती. नागरिकांनी अन्सारला ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले होते. घटनेनंतर गामीण रुग्णालयात मोठा जमाव गोळा झाला व काहींनी आरोपीचे हिदायत नगरातील घर जाळले होते.

पोलिसांविरोधात रोष
पोलीस प्रशासनाने आरोपीविरोधात योग्य कारवाई न केल्याने जमावाने तीव्र रोष व्यक्त करीत कारवाईची मागणी केली होती. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देत जमावाला शांत केले व प्रकरणाची चौकशी उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करून दोषींविरोधात कारवाईचे आश्वासन दिले होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !