जळगाव एसीबीची भुसावळात मोठी कारवाई : लाचखोर उपनिबंधक जगदीश बारीच्या लॉकरमधून एक कोटींचे सोने जप्त


Major Operation by Jalgaon ACB in Bhusawal: Gold Worth One Crore Seized from the Locker of Bribe-Taking Deputy Registrar Jagdish Bari भुसावळ (22 मे 2026)  : दिड लाखांच्या लाच प्रकरणात अटकेत असलेल्या जळगाव सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी यांच्या लॉकरमधून तब्बल एक कोटी सात लाख 44 हजार 75 रुपयांचा मुद्देमाल जळगाव एसीबीने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी जळगाव एसीबीच्या पथकाने भुसावळात येवून आरोपीच्या घराची झडती घेतली होती.

असे आहे लाच प्रकरण
एसीबीनुसार, तक्रारदाराविरुद्ध अवैध सावकारी संदर्भात कारवाई सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव कार्यालयात सुरू होती. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये तसेच अवैध सावकारी चौकशी अहवाल अनुकूल पाठवण्यासाठी जळगाव उपनिबंधक जगदीश बारी यांनी सुरुवातीला पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. नंतर ही रक्कम तीन लाख रुपये ठरली व पहिला हप्ता म्हणून दिड लाख स्वीकारण्याचे मान्य होताच एसीबीला तक्रार देवून सापळा रचण्यात आला. बुधवार, 20 मे रोजी सापळा रचला. आरोपी देविदास धनसिंग पाटील यांनी जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लिमिटेड, बी.जे. मार्केट, जळगाव येथे तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच त्यास पकडण्यात आले व नंतर बारी यासदेखील अटक करण्यात आली.

भुसावळातील बँक खात्यातून घबाड जप्त
एसीबीच्या माहितीनुसार, आरोपी जगदीश बारी (वय 56) हे सहकारी संस्था विभागात उपनिबंधक पदावर कार्यरत असून एसीबीने भुसावळ येथील कॉसमॉस बँकेतील त्यांच्या लॉकरची झडती घेतल्यानंतर या कारवाईत सुमारे 99 लाख चारहजार 960 रुपयांचे सोन्याचे दागिने, 8 लाख 36 हजार 500 रुपयांची रोख रक्कम तसेच चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

यांचा कारवाईत सहभाग
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. पथकात निरीक्षक स्मिता नवघरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार संगीता पवार, प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सूर्यवंशी, चंद्रशेखर चौधरी आदींचा विशेष सहभाग होता.

एसीबीने नागरिकांना भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले असून 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगितले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !