अनोळखी लिंकवर क्लीक केल्यास तुमचेही बँक खाते होईल रिकामे ; जळगावच्या शेतकर्‍याला सात लाखांचा गंडा


जळगाव  (22 मे 2026) : तुम्ही सोशल मिडीया वापरल असाल अन चुकून तुम्ही एखादी अनोळखी लिंक केली असल्यास तुमचेही बँक खाते रिकामे होवू शकते. होय ही बातमी खरी आहे, जळगावच्या शेतकर्‍याला या प्रकारे गंडा घालण्यात आला आहे. मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानंतर तब्बल सहा लाख 80 हजार रुपये वळते करण्यात आले. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे प्रकरण
अक्षय राजेंद्र पाटील (35, व्यवसाय शेती, रा. प्लॉट नं. 49, गट नं. 76/1/2, कोल्हे नगर, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागे, जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

16 मे 2026 रोजी दुपारी 2.30 ते रात्री 10.20 वाजेदरम्यान त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीकडून लिंक पाठविण्यात आली. फिर्यादीच्या मोबाईलमध्ये नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचे कोणतेही प नसतानाही संबंधित भामट्याने लिंकच्या माध्यमातून मोबाईलचा ताबा घेतला.

यानंतर आरोपीने सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे मोबाईल बँकिंग सुरू करून फिर्यादीच्या खात्यातून ऑनलाईन व्यवहाराद्वारे सहा लाख 80 हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !