यावल तालुक्यात तरुणाची आत्महत्या : पत्नीसह प्रियकराविरोधात गुन्हा
Youth Commits Suicide in Yawal Taluka: Case Registered Against Wife and Her Lover यावल (24 मे 2026) : यावल तालुक्यातील एका गावातील रहिवासी 26 वर्षीय तरुणाने गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. 13 मे रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. तरुणाच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरात एक चिठ्ठी सापडली या चिठ्ठीवरून मयत तरुणाची नवविवाहित पत्नी व तिचा प्रियकर विशाल युवराज पाटील (रा.सांगवी, ता.पारोळा) याला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणाला दिली होती धमकी
मयत तरुणाची पत्नी विवाहानंतरदेखील तिच्या प्रियकराशी सतत बोलत असायची. तिचा प्रियकर मयत तरुणाला सोशल नेटवर्कवर मेसेज करून धमकवत होता. तुझी आणि तुझ्या कुटुंबाची बदनामी करेल, पुण्याला आला तर तुझा मर्डर करेल, तुझ्या कुटुंबाची इज्जत उघडी पाडेल, तेव्हा यालाच कंटाळून 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.









