केरळमधील हायप्रोफाईल चोरीचा पर्दाफाश : भुसावळात चोरट्यांच्या चौकडीकडून 18 लाखांचे मोबाईल जप्त

आरोपी मंगला एक्स्प्रेसने पळून जात असताना कारवाई ः केरळच्या कन्नूरमध्ये झाली होती धाडसी चोरी


High-Profile Theft in Kerala Cracked : Mobile Phones Worth ₹18 Lakh Seized from Quartet of Thieves in Bhusawal भुसावळ (25 मे 2026) : केरळच्या कन्नूर शहरातील मोबाईल शॉपमधून 18 लाखांचे मोबाईल लांबवण्यात आले होते व संशयीत रेल्वेने पसार होत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाली होती. अलर्ट मोडवरील यंत्रणेने संशयीतांच्या वर्णनावरून भुसावळनजीक मंगला एक्स्प्रेसमधून चौकडीच्या मुसक्या बांधत चोरी केलेले मोबाईल जप्त केले. रेल्वे सुरक्षा बलाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बिहारसह हरियाणातील आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये राहुल जायसवाल नाथप्रसाद (32, वॉर्ड नं. 09, घोडासहन, जि.पूर्वी चंपारण, बिहार, ह.मु. रा.समालखा, गली नं. 06, मकान नं. 34, नवी दिल्ली), मोहम्मद नसीम अंसारी मोहम्मद वजीर अंसारी (30, वॉर्ड क्रमांक 08, शांती नगर, घोडासहन, जि. पूर्वी चंपारण, बिहार, ह.मु.मिंटू रोड, महाकाली मंदिराजवळ, नवी दिल्ली), रवी कुमार सहनी राजकुमार सहनी (22, सतमलपूर, बलिश नगर, जि.समस्तीपुर, बिहार, ह.मु. मींटू रोड, झुग्गी नं. 03, नवी दिल्ली), राधेश्याम रामेश्वर यादव (35, पूर्णिया कोरी, घोडासहन, जिला पूर्वी चंपारण, बिहार, ह.मु.फेज 3, नाथूपुर, जि.गुरुग्राम, हरियाणा) यांचा समावेश आहे. आरोपींना कन्नूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.



असे आहे मोबाईल चोरी प्रकरण
केरळच्या कन्नूरमध्ये महागड्या मोबाईल शॉपमधून लाखो रुपये किंमतीचे मोबाईल लांबवण्यात आले व संशयीत मंगला एक्स्प्रेसद्वारे पसार झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांना मिळाली. 22 रोजी कन्नूर ग्रामीण पोलीस अधीक्षक आयपीएस अनुज यांनी भुसावळ नियंत्रण कक्षाला माहिती कळवल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली.

मंगला एक्स्प्रेसमधून आवळल्या मुसक्या
रेल्वे सुरक्षा यंत्रणा आरोपींच्या वर्णनावरून शोध घेत असताना ट्रेन क्रमांक 12617 च्या जनरल डब्यात आरोपींचा शोध सुरू करण्यात आला व आरोपी नजरेस पडताच त्यांना भुसावळ स्थानकावरील प्लॅटफर्मा क्रमांक पाचवर गाडी येताच ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी चोरीची कबुली देत 18 लाखांचे अ‍ॅपलसह 37 महागडे मोबाईल फोन आणि 25 हजार 235 रुपयांची रोकड काढून दिली.

यांचा कारवाईत सहभाग
या कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक सुदामा यादव, उपनिरीक्षक श्याम यादव, सीडीपीस, सीआयबी टीम तसेच भुसावळचे आरक्षक कपिल कुमार तसेच ड्युटीवरील आरपीएफ जवानांचा सहभाग होता.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !