भुसावळातील अल्पवयीन तरुणीची सोशल मिडीयात बदनामी : जळगावच्या आरोपीविरोधात गुन्हा


Defamation of a Minor Girl from Bhusawal on Social Media : Case Registered Against Accused from Jalgaon भुसावळ (25 मे 2026) : भुसावळातील एका भागातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात जळगावच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर किरण पाटील (22, रा.कुसुंबा, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

असे आहे प्रकरण
17 वर्षीय अल्पवयीन पीडीता भुसावळची रहिवासी असून संशयित आरोपी सागर पाटील यांची जानेवारी 2023 पासून ओळख होती, या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले मात्र मैत्रीचा गैरफायदा घेत संशयित आरोपी सागर याने जानेवारी 2025 मध्ये पीडितेकडे लग्नाची आणि शारीरिक संबंधांची मागणी केली. पीडितेने ही मागणी नाकारल्यानंतर याचा राग मनात धरून आरोपीने पीडितेचा छळ सुरू केला. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही, सागरने ती घरातून बाहेर पडल्यावर तसेच क्लासला जात असताना तिचा सातत्याने पाठलाग केला. जाहीर ठिकाणी तिचा पाठलाग करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले तसेच पीडितेच्या संमतीविना इन्स्टाग्रामवर नावाचे एक बनावट अकाऊंट तयार केले. या बनावट खात्यावर त्याने पीडितेचे आणि स्वतःचे एकत्र फोटो पोस्ट करून तिची समाजमाध्यमांवर बदनामी केली. याबाबत वाच्यता केल्यास पीडितेच्या घरच्यांचे बरेवाईट करण्याची धमकीही त्याने दिली.



या त्रासाला कंटाळून पीडीत मुलीने भुसावळ शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी सागर पाटीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल भंडारे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !