भाजपा सत्तेवर येताच घुसघोर बांग्लादेशी सीमा रेषेवर ! बांगलादेशमध्ये परत जाण्यासाठी वाढली गर्दी


As soon as the BJP comes to power, Bangladeshi infiltrators flock to the border—a surge in crowds seeking to return to Bangladesh नवी दिल्ली (26 मे 2026) : पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेवर येताच घुसखोर बांग्लादेशींच्या तंबूत घबराट उडाली आहे. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या ओळख पटवा, हटवा आणि माघारी पाठवा या धोरणामुळे चिंतीत बांगलादेशी घुसखोर हे सीमारेषेवर मोठ्या संख्येने गोळा होऊ लागले आहेत. उत्तर 24 परगणा आणि मालदा येथे अनेक ठिकाणी बांगलादेशमध्ये परत जाण्यासाठी झालेली बांगलादेशी घुसखोरांची गर्दी पाहिल्यावर राज्यातील घुसखोरांविरोधातील अभियानाने केवळ कागदोपत्री कारवाई आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांपलिकडे जाऊन प्रशासकीय कारवाईचे रूप घेतल्याचे स्पष्ट आहे.

नागरिक पुन्हा बांग्लादेशात परतण्याच्या तयारीत
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बशीरहाट उप-विभागामध्ये असलेल्या हकीमपूर चेक पॉईंट येथे मंगळवारी सकाळी 100 हून अधिक बांगलादेशी पुरष आणि महिला गोळा झाल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बांगलादेशमध्ये परतण्याच्या प्रयत्नात आहेत.

यापैकी अनेक जण पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागात बेकायदेशीरपणे राहत होते. परदेशी नागरिकांना देशातून बाहेर काढण्याच्या आणि त्यांच्यासाठी होल्डिंग सेंटर बनवण्यासाठी सरकारने हल्लीच केलेल्या घोषणेनंतर ते चेकपॉईंटवर पोहोचले आहेत.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील घुसखोरांच्याविरोधात डिटेक्ट, डिलिट अ‍ॅण्ड डिपोर्ट ही रणनीती अवलंबण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर सीमेवर ही गर्दी दिसत आहे. दरम्यान, बीएसएफच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत झालेल्या एका बैठकीमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी ज्या व्यक्ती नागरिकत्वाच्या कायद्याच्या चौकटीबाहेर आहेत. त्यांना घुसखोर मानले जाईल आणि पोलीस त्यांना अटक करून बीएसएफच्या स्वाधीन करतील, असे सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !