यावल एकाचवेळी पाच दुचाकींची चोरी : रस्त्यावरच वाहने सोडून चोरटे पसार


यावल (27 मे 2026) : यावल शहरातुन भुसावळकडे जाणार्‍या रस्त्यावर शहरातील विस्तारीत परिसरात पुण्यनगरी व बालाजी सिटी परिसरातून मंगळवारी पहाटे साई ग्राफिक्स या दुकानाबाहेर लावलेल्या पाच दुचाकी चोरी करण्यात आल्या व हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला मात्र चोरट्यांनी चोरी केलेल्या दुचाकी रस्त्यावरच सोडून पळ काढला तर याच भागातील रहिवासी मिलिंद माळी यांच्या बंद घरात घरफोडी करीत साहित्याची नासधूस केली.

दुचाकी चोरीने खळबळ
चोरट्यांन माळी यांच्या दरवाज्याच्या कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला मात्र, घरात कुठलेचं मौलवान साहित्य नसल्याने त्यांनी तेथे साहित्याची नासधूस करीत काढता पाय घेतला.

या भागातून चोरट्यांनी तब्बल पाच दुचाकी चोरी करून भुसावळ रस्त्यावर नेल्या होत्या मात्र तेथुन दुचाकी पुढे नेण्यात ते यशस्वी ठरले नाही. पहाटे नागरीक शेतात व रस्त्यावर मार्निंग वाक करीता निघाल्याने या चोरट्यांनी दुचाकी रस्त्यावरचं सोडून दिल्या असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी यावल पोलिसात नागरीकांनी तक्रार नोंदवली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !