दहिगावच्या एमएसएफ जवानाचा चंद्रपुरच्या तलावात बुडून मृत्यू
यावल (28 मे 2026) : यावल तालुक्यातील दहिगावच्या सुरेश आबा नगरातील रहिवासी व चंद्रपूरात एमएसएफ जवान म्हणून कार्यरत जवानाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवार, 26 रोजी दुपारी घडली. विजय ओंकार काळे (34) असे मृत जवानाचे आहे. या घटनेमुळे दहिगाव परिसरात शोककळा पसरली.
तलावात बुडून मृत्यू
दहिगावातील विजय काळे हा चंद्रपूरात महाराष्ट्र सेक्युरिटी फौर्समध्येकार्यरत होता. मंगळवार, 26 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मित्रांसह चंद्रपूरातील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दोघे मित्र पाण्यात उतरले असता त्यांना वाचवण्याकरिता विजय काळे यांनी सुद्धा पोहण्यासाठी उडी टाकली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो लावात बुडाला. तरुणाचा मृतदेह बुधवार, 27 रोजी पहाटे पाण्यावर तरंगताना आढळला. याबाबत चंद्रपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा आहे. या आठवड्यात दहिगावात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. विजय हा गेल्या चार वर्षापासून एमएसएफमध्ये कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

