वरणगावातील तिरंगा सर्कल-भोगावती नदी दरम्यानचे वीज पोल काढण्यासाठी नगराध्यक्षांचे पाच तास ठिय्या आंदोलन

जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल आंदोलकांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर


वरणगाव (4 जून 2026) : वरणगाव शहरात पूर्व सूचना न देता अचानक लाईन जाणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे आदी प्रकारामुळे जनता वीज कंपनीच्या कारभाराला वैतागली आहे. त्यातच तिरंगा सर्कल ते भोगावती नदीदरम्यान व शहरातील प्रभात फेरी मार्गात अडसर ठरणार्‍या वीज पोलचे शिप्टींग करण्याच्या मागणीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आक्रमक पवित्रा घेत वीज कंपनीच्या कार्यालयात पाच तास ठिय्या मांडला.

वीज कंपनीचे अधिकारी धारेवर
वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एस.एस.पंचभूते, शहर अभियंता सचिन कुंभारे उपस्थित होते. आंदोलनात कामगार नेते मिलिंद मेढे, विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक नानाभाऊ चौधरी, माजी उनगराध्यक्ष अखलाक शेख, तालुकाध्यक्ष शामराव धनगरख शहराध्यक्ष सुनील माळी, युवा अध्यक्ष आकाश निमकर, मिलिंद भैसे, जनसेवक कुंदन माळी, तेजस जैन, फझल भाई शेखख अजमल भाई खान, बळीराम सोनवणे, हितेश चौधरी, कमलाकर मराठे, रामभाऊ माळी, बापू माळी, साबीर शेठ कुरेशी, डॉ.सादीक शेख, राहुल वंजारी, भोजराज पालवे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !