विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 15 जूनचा महिला लोकशाही दिन रद्द
जळगाव (8 जून 2026) : शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसर्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह शासकीय यंत्रणेकडून त्यांचे प्रश्न सोडविण्याची व्यवस्था करण्यात येते.
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सोमवार, 15 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.



