गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव 2026’चे आयोजन

आशा-सुमन स्वर सुमनांजलीतून उलगडणार आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांचा संगीत प्रवास


‘Mrigotsav 2026’ Organized at Godavari Sangeet Mahavidyalaya जळगाव (18 जून 2026) : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी संगीत महाविद्यालय यांच्या वतीने शनिवार, 20 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात मृगोत्सव 2026 अंतर्गत स्व.आशा भोसले आणि स्व.सुमन कल्याणपूर यांच्या संगीत प्रवास आशा-सुमन स्वर सुमनांजलीतून उलगडणार आहे. या कार्यक्रमात भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील दोन महान गायिकांच्या सुरेल गीतांचा आस्वाद या कार्यक्रमातून रसिकांना घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गाण्यांमधून आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या गायकीचा प्रवास उलगडला जाणार असून संगीतप्रेमींसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील हे राहणार आहेत.

मृगोत्सव 2026
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजी) आणि डॉ.केतकी पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रेरणास्थान म्हणून गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.वर्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सौ. पद्मजा नेवे देखिल उपस्थीत राहणार आहे. जळगावातील संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संगीत, गायन आणि नृत्य यांच्या संगमातून साकार होणारा हा ‘आशा-सुमन स्वर सुमनांजली’ कार्यक्रम मृगोत्सव 2026 जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक संस्मरणीय संध्याकाळ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !