ट्रक-दुचाकीत अपघात : दोघे ठार
शेणपूर फाट्याजवळील घटना : मयत गंगापूरचे निवासी : ट्रक चालकास अटक
साक्री : ट्रक व दुचाकीत अपघात होवून दोघांचा मृत्यू झाला. तालुक्यातील शेणपूर फाट्याजवळ शनिवार, 30 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला. पिंपळनेरहून साक्रीकडे येणारा ट्रक (क्र.एम.एच.10 डब्ल्यू.7307) आणि साक्रीकडून पिंपळनेरकडे जाणारी दुचाकी (क्र. एम.एच.18 एम.6592) यांच्यात धडक होऊन योगेश आप्पा गरदरे, अजय भटू कोरडकर (रा.गंगापूर) हे दोन जण जागीच ठार झाले तर विलास तान्हू कारंडे (रा.गंगापूर) हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

