हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस : धरणाचे दोन दरवाजे उघडले


Heavy rainfall in the Hatnur catchment area : Alert issued for riverside villages भुसावळ (28 जून 2026) : हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरण प्रशासनाने रात्री 9.00 वाजता जाहीर केलेल्या माहितीनुसार, हतनूर धरणाची सध्याची पाणीपातळी 211.510 मीटर इतकी असून, धरणाची पूर्ण जलसाठा पातळी (FRL) 214.000 मीटर आहे. धरणात सध्या 257.50 दशलक्ष घनमीटर (Mm³) म्हणजे 66.37 टक्के एकूण जलसाठा असून, उपयुक्त (लाईव्ह) जलसाठा 124.50 दशलक्ष घनमीटर (48.82 टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.

सध्या धरणाचे दोन रेडियल गेट प्रत्येकी 0.5 मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 72.0 क्युमेक्स (2,543 क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कालव्यातून 0.71 क्युमेक्स (25 क्युसेक) पाणी सोडण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

धरण परिसरात रविवारी 6 मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान 34 मिमी इतके झाले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पुढील काही तासांत विसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !