प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडून विनामूल्य नेत्रतपासणी सह विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
यावल (7 जुलै 2026) : यावल तालुक्यातील दहिगाव येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडून विनामूल्य नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. गावातील हरिजन वस्तीगृहात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे यावेळी वाटप करण्यात आले. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला.
शालेय साहित्याचे वाटप
दहिगाव, ता.यावल येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, यावल तालुका यांच्यावतीने आदर्श विद्यालय, दहिगाव येथील हरीजन गिरीजन वसतीगृहात विद्यार्थ्यांना अधीक्षक एन.के.पाटील यांच्या उपस्थित वह्या व पेन बिस्किट वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमात संघटनेचे तालुकाध्यक्ष हरीभाऊ विजय पाटील, उपाध्यक्ष प्रतीक वासुदेव पाटील, कैलास निंबा पाटील, ललित कडू पाटील, सुरेश मांगो पाटील, चंद्रकांत गोकूळ पाटील, पंढरीनाथ पाटील, पवन पाटील सह आदींची उपस्थिती होती.
गावात कांताई नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमानाने संघटनेच्या वतीने विनामूल्य मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 42 रुग्णांची तपासणी करण्यात आली व यातून 12 रुग्णांची शस्त्रक्रियेकरीता निवड करण्यात आली. या रुग्णांवर कांताई नेत्रालयात मोफत शस्त्रक्रीया केली जाणार आहे. या शिबिरात रूग्ण तपासणी करीता डॉ.योगेश माळी, अदनाम शेख, अनवर मलीक यांनी काम पाहिले. शिबिर यशस्वीतेसाठी हेमचंद्र चौधरी, रामदास पाटील, वासुदेव बडगुजर, महिला यावल शहराध्यक्ष मीनाबाई देशमुख, सपना वायकोळे, सुरेश पाटील, पंढरीनाथ पाटील, पवन पाटील आदींनी परिश्रम घेतले.