पंढरपूरात शासकीय महापूजा सुरू असतानाच जवानाने रायफलमधून गोळी झाडत संपवले जीवन


पंढपपूर (रविवार, 26 जुलै 2026) : पंढरपूर येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. शनिवारी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रामेश्वर ध्रुपद साबणे (30, रा.गंगाखेड, जि. परभणी) असे जीवनयात्रा संपवलेल्या जवानाचे नाव आहे.

शासकीय महापूजा सुरू असताना घटना
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा भाग म्हणून परभणी येथून एसआरपीएफची तुकडी पंढरपुरात दाखल झाली होती. शनिवारी पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सुरू असतानाच, पंढरपूर-कासेगाव रस्त्यावरील आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी जवान रामेश्वर साबणे यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा तीव्र आवाज होताच परिसरात तैनात इतर पोलीस कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धावले. गोळी वर्मी लागल्यामुळे रामेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला होता.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !