भुसावळ शहरातील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल


भुसावळ (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : शहरातील वांजोळा रोड, निवृत्ती नगर भागातील रहिवासी असलेल्या 34 वर्षीय तरुणाने कुठल्यातरी कारणावरून राहत्या घरात गळफास घेतला. विक्रांत गोविंदा पाटील (34, निवृत्ती नगर, वांजोळा रोड, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.

विक्रांत पाटील या तरुणाने रविवारी राहत्या घरच्या वरच्या खोलीत पंख्याच्या कडीला साडीने गळफास घेत जीवन संपवले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार राजकिरण झाल्टे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !