चोपडा शहरातील तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून 3.87 लाखांचा गंडा ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : एका शिक्षण संस्थेत शिक्षिकेची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चोपडा शहरातील 24 वर्षीय तरुणी तीन लाख 87 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला..
नोकरीच्या आमिषाने फसवणूक
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, विद्या विश्वास बाविस्कर (32,रा. गुरुकुल नगर, चोपडा) या उच्च शिक्षित असून त्यांना संशयीतांनी मालापूर येथील तुळशिराम कामाजी बाविस्कर या उच्च प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी संगनमताने तीन लाख 87 हजार रुपये 23 एप्रिल 2022 ते 17 जुन 2024 दरम्यान वेळोवेळी फिर्यादीचे वडील विश्वास बाविस्कर यांच्याकडून स्वीकारले.
चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा
नोकरी मिळेल या अपेक्षेने फिर्यादी विद्या बाविस्कर आणि त्यांच्या वडिलांकडून आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी रोख रक्कम घेतली. मात्र, पैसे घेऊनही नोकरी लावून दिली नाही. तसेच घेतलेली रक्कम परत करण्यासही टाळाटाळ करण्यात आली त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चोपडा ग्रामीण पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी गोपाल शालिक दाभाडे, प्रकाश गबा चव्हाण (दोन्ही रा.चोपडा) व गोरख बुधा बोरसे (पारगाव, ता.चोपडा) यांच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास चोपडा ग्रामीणचे पोलीसस उपनिरीक्षक मोहित मोरे करीत आहेत.
