लोकसभेत पेपर लीक सुधारणा विधेयक मंजूर !

सात वर्षांची शिक्षा व 10 कोटींपर्यंत दंड ; राज्यसभेत वंदेमातरमशी संबंधित सुधारित विधेयक मंजूर


नवी दिल्ली (बुधवार, 29 जुलै 2026) : लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित ‘लोक परीक्षा (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ बुधवारी ध्वनी मताने मंजूर झाले. या विधेयकावर मंगळवारी नऊ तास चर्चा झाली. बुधवारी विरोधकांकडून राहुल गांधींनी विधेयकावर 50 मिनिटे भाषण केले. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक मंजूर झाले.

यानुसार पेपरफुटीशी संबंधित कायदे अधिक कठोर करण्यात आले आहेत. आता पेपरफुटीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

तर राज्यसभेत राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध सुधारणा विधेयक (2026) मंजूर झाले. आता जन-गण-मन प्रमाणे वंदे मातरमला कायदेशीर संरक्षण मिळेल. वंदे मातरमचा अपमान, अनादर करणे आणि गायनात अडथळा आणणे हा दंडनीय गुन्हा असेल.

वंदे मातरमचा अपमान करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई
राज्यसभेने वंदे मातरमचा अपमान केल्यास हा शिक्षापात्र गुन्हा ठरवणारे विधेयक मंजूर केले आहे. हा कायदा वंदे मातरमचा अपमान करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करतो.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !