फकिरा संघर्ष, स्वाभिमान आणि आत्मबळाची जिवंत शाळा : प्रा.डॉ.जतीनकुमार मेढे


भालोद (शनिवार, 1 ऑगस्ट 2026) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ ही केवळ कादंबरी नसून संघर्ष, स्वाभिमान आणि आत्मबळाची जिवंत शाळा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने फकिरा ही कादंबरी आवर्जून वाचावी. ही कादंबरी वाचणार्‍या व्यक्तीला जीवनाचा खरा अर्थ, स्वाभिमानाचे महत्त्व आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते. फकिरा मनामध्ये आत्मविश्वास आणि आत्मबळ जागवणारी साहित्यकृती आहे, असे प्रतिपादन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जतीनकुमार मेढे यांनी केले.

सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.किशोर कोल्हे होते.

अण्णाभाऊंच्या साहित्यातून संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणा
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. किशोर कोल्हे यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करण्याचे आवाहन केले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विद्यार्थ्यांना संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणा देते, तर लोकमान्य टिळकांचे राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण आणि कणखर व्यक्तिमत्त्व प्रत्येक तरुणासाठी आदर्श आहे. या दोन्ही महापुरुषांचे विचार आचरणात आणल्यास जीवन अधिक यशस्वी आणि मूल्याधिष्ठित होईल, असे त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच बहिणाबाई अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अतिकेश माळी, धीरज भालेराव, मुकेश भालेराव, सचिन पाटील, मोहित नेहते, जीवन भालेराव, विजय भालेराव, रूपम कोळी, कुणाल कोळी, अजय भालेराव, अभय सपकाळ, अजय पाटील, करिश्मा कोळी,पल्लवी कोळी, प्रियंका कोळी आणि आशुतोष भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !