भुसावळात गुरू माऊलींच्या सान्निध्यात राखी पौर्णिमा सण उत्साहात


भुसावळ (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) :  प.पू.जैन गुरूमाऊली सम्यक् दर्शनाजी म.सा.आदी ठाणे तीन यांचे प्रवचन सकाळी 8.45 ते 10.55 दरम्यान शहरातील सुराणा साधना भवनमध्ये दररोज मोठ्या उत्साहात सुरू आहे. शुक्रवार, 28 रोजी राखी पौर्णिमेनिमित्त जैन बंधू-भगिनींनी राखी उत्सव साजरा केला.

सर्व भाविकांनी आनंदोत्सव व जप-तप-भक्तिगीते गाऊन आनंदोत्सव साजरा केला. गुरूमाऊलींनी प्रवचनाद्वारे राखी पौर्णिमेची महत्त्वपूर्ण माहिती सांगितली.

कार्यक्रमात दोनशे ते तीनशे भाविक भक्तजनांनी भाग घेतला. यावेळी संघपती जयंतीलाल सुराणा, जे.बी. कोटेचा,अशोक सुराणा, धरमचंद चोपडा, सुरेशचंद्र देवडा, कांतीलाल चोरडिया, गौतम चोरडीया, अतुल ताथेड, अशोक डोसी, राजेश बाफना, विनोद मेहता, राजेश मेहता, राजेश छाजेड, महेंद्र सुराणा, विशाल चोरडिया, उत्तमचंद कोटेचा, सुरेशचंद्र कुमट, दिनेश संचेती, विनोद डोसी, बन्सीलाल चिप्पड, आर.बी.चोपडा यांच्यासह जैन बंधू भगिनी आनंदाने सहभागी झाल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !