पिंपळनेर पोलिसांची बनावट विदेशी दारू तस्करीवर धडक कारवाई : 8.82 लाखांचा मुद्देमाल जप्त


पिंपळनेर (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : बनावट विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणार्‍याविरुद्ध पिंपळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत रॉयल ब्लू व्हिस्कीच्या बनावट दारूचे 45 बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पिकअप गाडी, असा एकूण आठ लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पसार झाला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नामदेव सहारे यांना रविवार, 18 ऑक्टोबर 2026 रोजी बनावट विनेश उर्फ आमोश छगन ठिंगळे (रा.शेंद्यावळ, पो.उमरपाटा, ता.साक्री) हा बसरावळ गाव शिवारातील शेतातील घरात बनावट विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक (एम.एच.48 सी.बी.2473) मध्ये चार लाख 32 हजार रुपये किंमतीचा बनावट विदेशी दारूचा साठा आढळला. या दारूवर कुठलाही बॅच नंबर वा किंमत पोलिसांना न आढळला नाही. पोलिसांनी दारूसाठ्यासह वाहन जप्त केले मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयित पसार झाला.





8.82 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये चार लाख 32 हजार रुपये किमतीची रॉयल ब्लू व्हिस्कीची बनावट विदेशी दारू आणि चार लाख 50 हजार रुपये किंमतीच्याप महिंद्रा पिकअप वाहनाचा समावेश आहे. दारूच्या 180 मिली क्षमतेच्या एकूण 45 बॉक्समध्ये 2,160 बाटल्या आहेत. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, अंमलदार बापू पिंपळे, चंद्रकांत खेनार, कपिल पावरा, रिमा कुवर, पंकज वाघ आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !