अमळनेरातील कुटूंबाच्या आत्महत्येचे कारण आले समोर पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने टोकाचा निर्णय

संशयीताला अमळनेर पोलिसांकडून अटक : मृताच्या बहिणीने दिली तक्रार


अमळनेर (रविवार, 30 ऑगस्ट 2026) :आपल्या दोन मुलांसोबत धावत्या रेल्वेखाली अमळनेर तालुक्यातील टाकरखेड्यातील दाम्पत्याने आत्म्हत्या केली होती. पोलीस तपासात एका संशयीताने मृताच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने त्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. 27 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास दामप्त्याने आपल्या दोन चिमूकल्यांसह आत्महत्या केली. या प्रकरणी सीताराम उर्फ गटलु तानकु भील याला अटक करण्यात आली असून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली.

बदनामी केल्याने टोकाचा निर्णय
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील सुनील अमृत भील, पत्नी पार्वती सुनील भील यांनी मुलगा सनी व राज यांच्यासोबत शहराजवळील रेल्वे रूळावर झोकून देत आत्महत्या केली होती. तपासादरम्या मयत सुनील भील याने पहाटे आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या मोबाईलवर एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यात त्याने पँटच्या मागच्या खिशात लाल डायरीत चार पाच नंबर पार्वतीच्या आई-वडिलांचे व खालचे दोन नंबर आपल्या भावाचे असल्याचे सांगत त्यांना कळवून देण्याचे या व्हिडिओत म्हटले होते. माझ्या पत्नीने काहीच केले नाही तरी तुम्ही आमचा घात केला रे … ही माझी मुले असे व्हिडिओमध्ये म्हटले होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना संशय याबाबत
आल्याने त्यांनी गावात चौकशी करीत सीताराम उर्फ गटलू याला सकाळीच ताब्यात घेतले.


मानसिक त्रास दिल्याचे उघड
मयत सुनीलची बहीण सरलाबाई भगवान भील (40, हातेड, ता.चोपडा) हिने अमळनेर पोलिसात या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार 26 रोजी भाऊ सुनीलने मुलगा रामकृष्ण याच्या मोबाईलवर फोन करीत गावातील सीताराम उर्फ गटलु तानकु भील हा पत्नीसोबत संबंध असल्याचे सांगून मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले होते. 26 रोजी संशयीत घरी आला व त्याने आमच्याआड आला तर तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकेल व तुला हा प्रकार सहन होत नसल्यास तू मरून जा, असेदेखील म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. मानसिक त्रासामुळेच भावाने पत्नी पार्वती आणि मुलांसह रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून तपास एपीआय गणेश अहिरे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !