जळगावातील नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश : राष्ट्रीय महामार्ग कंत्राटदार कंपनीचे एमडी, जीएमसह संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा


जळगाव (मंगळवार, 1 ऑगस्ट 2026) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील पाळधी-जळगाव नवीन बायपासच्या कामाची गुणवत्ता, ओव्हरब्रिजचा भराव खचणे आणि अपुर्‍या सुरक्षा उपायांमुळे नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेल्या धोक्याबाबत नगरसेवक अरविंद देशमुख यांनी सातत्याने नहीं व प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला होता. नहींला तीन वेळा निवेदने देण्यासह पोलीस प्रशासनाकडे जबाबदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याासह जिल्हाधिकार्‍यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत जळगाव तालुका पोलिसांनी बायपासचे काम करणार्‍या ‘ग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता व संबंधित साईट अधिकार्‍यांविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे भारतीय न्याय संहितेतील कलम 105 अर्थात सदोष मनुष्यवधाशी संबंधित गंभीर कलमासह अन्य कलमे लावण्यात आली आहेत.

8 ऑगस्टपासून सातत्याने लेखी पाठपुरावा
पावसामुळे बायपासवरील ओव्हरब्रिजचा भराव खचल्यानंतर वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर 8 ऑगस्ट 2026 रोजी देशमुख यांनी छक-खला लेखी निवेदन देऊन संभाव्य जीवितहानीचा इशारा दिला होता. सुरक्षित लेन सुरू करणे, शहरातील अवजड वाहतुकीचा ताण कमी करणे आणि तातडीच्या सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतरही परिस्थिती न सुधारल्याने नहींला एकूण तीन लेखी निवेदने देऊन रोड सेफ्टी ऑडिट, खड्डे दुरुस्ती, बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर, सूचना फलक, प्रकाशव्यवस्था व वाहतूक नियंत्रणाची मागणी करण्यात आली. वाढत्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडेही जबाबदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी करण्यात आली.


जिल्हाधिकार्‍यांकडे केली मागणी
25 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे स्वतंत्र निवेदन देऊन नहीं, पोलीस, महानगरपालिका व संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक, तातडीचे रोड सेफ्टी ऑडिट आणि अधिकारी-कंत्राटदारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देशमुख यांनी केली. या कालावधीत महामार्गावरील दुर्घटनांमध्ये मंगला अर्जुन माळी (5 ऑगस्ट), प्रेमराज शिवराम चौधरी (20 ऑगस्ट), योगेश कडू महाजन (20 ऑगस्ट) आणि अनिरुद्ध सुरेश डहाके (23 ऑगस्ट) यांच्यासह नागरिकांचे बळी गेले. बळींची संख्या वाढत असतानाच देशमुख यांनी प्रशासनाला वारंवार सावध करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी अधिक तीव्र केली.

पुन्हा अपघातात प्रौढाचा बळी
यानंतर 30 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर सुमारे 2 ते 2.15 वाजता ममुराबाद-आसोदा बायपास सर्व्हिस रोड परिसरात एका लेनवर ट्रक (क्रमांक एम.एच.05 डी.के.5314) व तवेरा वाहन (क्रमांक एम.एच.48 पी.0755) या दोन वाहनाचा मोटर अपघात झाला. या अपघातात शांताराम केशव पाटील (58, रा.शिंदखेडा, ता.रावेर) यांचा मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले. या अपघाताबाबत रामचंद्र ईश्वर महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

कंत्राटदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
रस्त्याच्या कामाची स्थिती तसेच दुर्घटनास्थळी आवश्यक बॅरिकेडिंग, सूचना फलक व इतर सुरक्षा उपायांच्या अनुषंगाने पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत ग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता आणि संबंधित साईट अधिकार्‍यांविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा क्र. 262/2026 अन्वये आता गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यात बीएनएस कलम 105, 290, 3(5), मोटार वाहन (सुधारणा) कायदा कलम 198-अ तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याचे कलम 3 व 4 लावण्यात आले आहेत. यातील कलम 105 हे सदोष मनुष्यवधाशी संबंधित गंभीर कलम आहे.

आता जबाबदार प्रत्येकाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करा : अरविंद देशमुख
8 ऑगस्टपासून आम्ही लेखी स्वरूपात संभाव्य धोका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत होतो. नहींला तीन वेळा निवेदने दिली, पोलीस प्रशासनाकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि जिल्हाधिकार्‍यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. दुर्घटना आणि जीवितहानी सुरूच राहिली. सरकारतर्फे सदोष मनुष्यवधासह गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला मात्र ही केवळ सुरुवात आहे. निष्पक्ष तपास करून प्रत्यक्ष जबाबदार असलेल्या प्रत्येकाची भूमिका निश्चित करून कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय आणि जळगावकरांना सुरक्षित महामार्ग मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील, असेही ते म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !