जामनेर तालुक्यात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ; 189 रेकॉर्डवरील आरोपींची झाडाझडती, 52 दुचाकींसह रिक्षा जप्त

दारूबंदी कायद्यान्वये 19 कारवाया : 5.70 लाखांचा मुद्देमाल जप्त : पाच जणांविरोधात अजामीनपात्र नोटीसांची अंमलबजावणी


जामनेर (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी जामनेर तालुक्यातील जामनेर, पहूर आणि फत्तेपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 189 रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. यावेळी दारूबंदी कायन्वये 19 केसेस करण्यात आल्या तर पाच लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी 52 दुचाकींसह रिक्षा जप्त करण्यात आली तर पाच अजामीनपात्र नोटीसांची अंमलबजावणी करण्यात आली.

52 मोटारसायकली जप्त
कारवाईदरम्यान संशयित 52 मोटारसायकली व 1 रिक्षा ताब्यात घेऊन त्यांची कागदपत्रे व इतर बाबींची तपासणी करण्यात आली. संबंधित वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयामार्फत तपासण्यात येत असून, तपासणीनंतर दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

अशी झाली कारवाई
जामनेर हद्दीत 72 रेकॉर्डवरील संशयीत तसेच एक हद्दपार तपासण्यात आला व एका हद्दपार नोटीशीची बजावणी करण्यात आली. दहा दुचाकींसह एक रिक्षा जप्त करण्यात आली व दारूबंदी कायद्यान्वये सहा केसेस करण्यात आल्या.

पहूर हद्दीत 64 संशयीत तपासण्यात आले तसेच दारूबंदी कायद्यान्वये 10 केसेस करण्यात आल्या. 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या तसेच चार एनबीडब्ल्यू वॉरंट बजावण्यात आले.

फत्तेपूर हद्दीत 189 संशयीत तपासण्यात आले व एका हद्दपार नोटीसीची बजावणी करण्यात आली. दारूबंदीच्या तीन केसेस झाल्या तर 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या. एका एनबीडब्ल्यू वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली.

गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात धडक कारवाई
आगामी सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे, या उद्देशाने अशा प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

यांचा कारवाईत सहभाग
कोम्बिंगमध्ये जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिले, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, सहा.निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे, सहा.निरीक्षक स्वप्नील शिंदे, फत्तेपूरचे सहा.निरीक्षक अंकुश जाधव, पहूरचे सहा.निरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह 17 अधिकारी, 150 अंमलदार व चार आरसीपी पथकाचा सहभाग होता.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !