शेळगाव बॅरेजमध्ये मासे पकडताना नशिराबादचा तरुण वाहिला


यावल (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : शेळगाव बँरेज येथील तापी नदी पात्रात नशिराबाद, ता.जळगाव येथील दोघे दुचाकीवर मासे पकडण्यासाठी आले असता असता एक तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने आधी पाण्यात बुडालाा व नंतर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना रविवारी घडली. सायंकाळपर्यंत शोध मोहिमेनंतरही तरुणाचा पत्ता लागला नाही.

काय घडले तरुणासोबत ?
नशिराबाद येथील सिराज टेलर नामक तरुण त्याच्या एका मित्रासह शेळगाव बॅरेजच्या तापी नदीपात्रात उत्तरेस मास पकडण्यासाठी आला असता टेलर हा पाण्यात उतरला होता. अचानक तो खोल पाण्यात बुडाला व बॅरेज मधुन सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात तो आला. नागरीकांच्या डोळ्यासमोर तो पाण्यात वाहून गेला. घटनेनंतर त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली.

सिराज टेलर हे अन्सार शेख यांच्यासोबत रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान शेळगाव परिसरात मच्छी पकडण्यासाठी आले होते. घटनेची माहीती अन्सार शेख यांनी नशिराबाद येथे कळवल्यानंतर नशिराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. सिराज टेलर यांचा पाण्यात शोध घेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते मात्र तो मिळून आला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला. तरुणाच्या परिवारात दोन मुली, मुलगा आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !