खेडीढोकला भरदिवसा घरफोडी : स्थानिक आरोपी पारोळा पोलिसांच्या जाळ्यात

दोन 57 हजारांचा मुद्देमाल जप्त : तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्याची उकल


पारोळा (सोमवार, 7 सप्टेंबर 2026)  : पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे भर दिवसा घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. पारोळा अवघ्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत गावातील आरोपीला अटक केली. आरोपीकडून दोन लाख 57 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. गोकुळ ऊर्फ दादू धर्मसिंग पाटील (22, खेडीढोक, ता.पारोळा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

भर दिवसा झाली घरफोडी
पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे शेतकरी सुपडू नारायण पाटील (51) हे कुटूंबासह वास्तव्यास आहे. 5 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून 50 हजारांची रोकड, सात व 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा खळा तसेच पाच ग्रॅमची पोत मिळून दोन लाख 57 हजारांचा ऐवज लांबवला. पारोळा पोलिसात याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे गावातील संशयीत गोकुळ ऊर्फ दादू धर्मसिंग पाटील (22, खेडीढोक, ता.पारोळा) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने घरफोडीची कबुली देत संपूर्ण मुद्देमाल काढून दिला.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सहा.निरीक्षक योगेश महाजन, हवालदार कैलास साळुंके, गिरीश सोनवणे, आशिष गायकवाड, सुनील पाटील, सतीश पाटील, चत्तरसिंग महेर, अनिल राठोड आदींच्या पथकाने केली.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !