भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 32 विषयांना बहुमताच्या जोरावर मंजुरी ; विरोधकांचा मात्र विविध मुद्यांवर आक्षेप

विरोधकांचा मात्र सभा बेकायदेशीर असल्याचा दावा ; अनेक विषयांवर नोंदवली हरकत


भुसावळ (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026) : भुसावळ पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार, 17 रोजी सकाळी 11.15 वाजता पालिका सभागृहात झाली. यावेळी सत्ताधार्‍यांनी मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यासह एकूण 32 विषयांना बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली. पालिकेतील विरोधक मात्र अलीकडेच शिंदे गटात गेलेल्या उपस्थित 10 नगरसेवकांनी गतवेळच्या सभेबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे 308 अन्वये चौकशी सुरू असल्याने गतवेळेची व आताची सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करीत अनेक विषयांवर आक्षेप नोंदवला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे होत्या. यावेळी मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपमुख्याधिकारी परवेज शेख, गटनेता युवराज लोणारी, बबलू बर्‍हाटे आदींची उपस्थिती होती.




बंद पथदिवे, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गाजला
विरोधकांनी शहरातील विविध भागातील बंद असलेले पथदिवे, मोकाट कुत्रे तसेच रेल्वेकडून होत असलेल्या अतिक्रमणावर आक्षेप नोंदवला. खडका रोड तसेच जळगाव रोडवर अनधिकृपणे मांस-मच्छी विक्रेते व्यवसाय करतात मात्र सायंकाळी सर्व घाण रस्त्यावर वा नाल्यात टाकत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी सर्वच नगरसेवकांनी केली. चावरीया नामक अधिकार्‍याच्या तक्रारी यावेळी नगरसेवकांनी करीत त्यांचा पदभार अन्य अधिकार्‍याकडे देण्याची मागणी केली. भाजपा नगरसेवकांनी सर्व 32 विषयांना बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !