भुसावळात भारत विकास परिषदेतर्फे गुरुवंदन छात्र अभिनंदन कार्यक्रम उत्साहात
भुसावळ (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : भारत विकास परिषदेच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा गुरुवंदन छात्र अभिनंदन हा कार्यक्रमाचे शुक्रवार, 18 सप्टेंबर रोजी शहरातील फालक शाळेत आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शिक्षकांप्रती आदर वाढावा आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर शिकवताना योग्य ते संस्कार करावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
यांची होती उपस्थिती
शाखेचे अध्यक्ष रमाकांत भालेराव आणि कोषाध्यक्ष कपिल मेहता यांनी प्रतिमा पूजन व तुलसी पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू दिल्या व आपल्या गुरुंप्रती भावना व्यक्त केल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष देऊन अभिनंदन केले. यावेळी रमाकांत भालेराव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी अध्यक्ष सतीश खडायते व उपाध्यक्ष हरीश कोल्हे, महिला सहभागीता संयोजिका जयश्री चौधरी, कोषाध्यक्ष कपिल मेहता उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमलता चौधरी तर आभार अतुल सोनुने यांनी मानले. यावेळी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



