भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश स्कूलमध्ये आर्ट व सायन्स एक्झीबिशन
स्व.बाबासाहेब नारखेडे यांच्या 46व्या पुण्यतिथीनिमित्त उपक्रम
भुसावळ (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : स्व.बाबासाहेब नारखेडे यांच्या 46व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शनिवार, 19 रोजी आर्ट व सायन्स एक्झीबिशनचे आयोजन करण्यात आले. ,
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे होते. भगीरथी प्राथमिक विद्यालयाच्या संचालक सदस्य जयश्री चौधरी, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, अर्चना नारखेडे, रमाकांत फालक, शैलजा फालक, पर्यवेक्षिका राखी बढे यांनी दीपप्रज्वलन व मार्ल्यापण केले.

थक्क करणार्या विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण
अतिथी जयश्री चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. प्री प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व यमक जुळवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, मुखवटे बनवणे, शुभेच्छापत्रे, रंगकाम, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे, सॅलड सजावट, मेहंदी आणि रांगोळी स्पर्धेचे परीक्षक हेमंत कुकरेजा व पंकज साखरे उपस्थित होते. सायन्स प्रोजेक्टचे परीक्षक म्हणून जितेंद्र पाटील व चैताली पाचपांडे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून विविध संदेश दिले तर टाकावूपासून टीकावू वस्तू बनवून दाखवल्या. आठवी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध उर्जेची रुपे, जलचक्र सॅटेलाईट कम्युनिकेशन, हायड्रोलिक ब्रेक, स्वयंचलित पाणी व्यवस्थापन, अग्नीरोधक अलार्म, गॅस लिकेज डिटेक्टर, लेझर सिक्युरीटी, सोलर एनर्जी, होलग्राम टेस्लाकॉईल वॉटर फिल्टर अशी विविध प्रकारची विज्ञानासंदर्भात 38 पेक्षा जास्त मॉडेल सादर केली. 500 हून अधिक पालकांचा सहभाग नोंदवला.
सूत्रसंचलन शबनत तडवी यांनी केले. एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमधील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



