भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात राज्यस्तरीय स्मृती स्पर्धांचे उद्घाटन
भुसावळ (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक स्व.बाबासाहेब के.नारखेडे यांच्या 46व्या पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन, वक्तृत्व, उत्स्फूर्त वक्तृत्व व सुगम संगीत स्पर्धा तसेच शिक्षकांसाठी कथा, काव्यलेखन, लेखकांसाठी कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी लेखन आदी राज्यस्तरीय पुरस्कार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे उदघाट्न सोमवार, 21 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यांची होती उपस्थिती
राज्यस्तरीय स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन संस्था कार्यकारिणी सभासद भाग्येश मकरंद नारखेडे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सभासद विकास पाचपांडे, सल्लागार वकील पी ई.नेमाडे, संस्था सदस्य अर्चना मकरंद नारखेडे, श्वेता भाग्येश नारखेडे, शैला फालक, समुपदेशक आरती चौधरी यांची उपस्थिती होती.

परीक्षकांचा सन्मान
स्व.बाबासाहेब के.नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा व आंतरवर्गीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विविध परीक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. बालवैज्ञानिक स्पर्धेचे उद्घाटन अर्चना नारखेडे, हस्तकला स्पर्धेचे उदघाट्न प्रमोद नेमाडे, आय.टी.सॉफ्ट फ्युजन स्पर्धेचे उद्घाटन विकास पाचपांडे, इलेक्ट्स व्हीजन स्पर्धेचे उद्घाटन भाग्येश नारखेडे यांच्याहस्ते झाले.
व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक सुनील पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख एम.ए.तडवी यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटक भाग्येश नारखेडे यांचा परिचय रुपाली भारंबे यांनी करून दिला. परीक्षक व पुरकार यादीवाचन एस.पी.झांबरे यांनी केले. स्पर्धकांना महत्त्वाच्या सूचना एम.व्ही.गरुडे यांनी दिल्या. सूत्रसंचालन दीप्ती जावळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक राणे यांनी मानले.
या कार्यक्रमास विद्यालयातील दोन्ही शाखेतील शिक्षक- शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचारी, संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राज्यातील विविध शाळांमधून आलेले स्पर्धक त्यांच्या समवेत त्यांचे पालक व शिक्षक सुद्धा उपस्थित होते.


