भुसावळातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.मकरंद नारखेडे बिनविरोध


भुसावळ (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : शहरातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.मकरंद नारखेडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शहरातील तु.स.झोपे विद्यामंदिरात मंगळवारी 66 वी सर्वसाधारण सभा मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी 2026 ते 2030-31 या पाच वर्षांसाठी डॉ.मकरंद नारखेडे यांची श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर डॉ.मकरंद नारखेडे, सेक्रेटरी प्रभाकर विठ्ठल पाटील, संस्था सदस्य विकास पाचपांडे, प्रमोद नेमाडे, कार्यकारीणी सदस्य भाग्येश नारखेडे व संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते. निवडीनंतर डॉ.मकरंद नारखेडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. के.नारखेडे विद्यालयाचे संगणक विभागप्रमुख व एमटीएस परीक्षा समिती प्रमुख भगवान पाटील तसेच हेड क्लार्क प्रमोद तळेले यांनी डॉ.नारखेडे यांचे पुष्पगुच्छ देवून यावेळी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !