वरणगावात श्री विसर्जन मिरवणुकीनंतर रस्त्यांची स्वच्छता
वरणगाव (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : गणपती विसर्जनानंतर वरणगाव शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर गुलालाचा थर साचला होता शिवाय वाहनांच्या वर्दळीच्या माध्यमातून हा गुलाल नागरिकांच्या घरात पोहोचत होता. वरणगावचे नगरसेवक नाना चौधरी यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांना या संदर्भात कल्पना दिल्यानंतर पालिका प्रशासनाला सूचना करताच शहरातील रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. पालिका प्रशासनाने या रस्त्यांची तातडीने स्वच्छता मोहिम राबवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
